बिल्व वृक्षाच्या शोधात हजारो वर्षांची प्राचिन संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात पर्यावरण,समाजजीवन,जीवसृष्टी यासंबंधी इतकी विविधता आहे कि,जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही नसेल. आपली संस्कृती आपले सण,उत्सव,देवता व त्यांच्या पूजा पद्धती यासर्व निसर्गाच्या ऋतूचक्रावर आधारित आहे,या पूजा पद्धतीमध्ये लागणाऱ्या वनस्पती व पत्री देखील इतक्या बारकाईने अभ्यासपूर्वक त्या त्या देवतेच्या तत्वा विषयी ठरवून दिलेल्या आहेत कि आश्चर्य वाटते.मग ती विष्णूची तुळस असेल किंवा गणपतीची दुर्वा किंवा एकवीस पत्री.या सर्वांपासुन थोडी निराळी अशी प्राचिन देवता आहे शिव. ज्याच्या पूजेत अवडंबर असे काहीच नसते अगदी साध्या साध्या गोष्टीउदा.भस्म,जल,चंदन,अक्षता व सर्वात महत्वाचे म्हणजे बेलाचे पान,या त्रिदल पत्रामुळे तो आपल्या भक्तावर प्रसन्न होतो.म्ह्णूनच म्हटले आहे “ त्रिदलं त्रिगुणाकार त्रिनेत्र च त्रिधायुतम I त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्र शिवार्पणम II ” हा आदिनाथ म्हणजे युगा युगांचा योगी ज्याचे वास्तव्य गाव कुसा पासून दूर कुठेतरी अरण्यात किंवा नदीकाठी स्मशानात,त्याचे देवालयही असेच आडबाजूला असते जिथे कुण...