Posts

Image
बिल्व वृक्षाच्या शोधात हजारो वर्षांची प्राचिन संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात पर्यावरण,समाजजीवन,जीवसृष्टी यासंबंधी इतकी विविधता आहे कि,जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही नसेल. आपली संस्कृती आपले सण,उत्सव,देवता व त्यांच्या पूजा पद्धती यासर्व निसर्गाच्या ऋतूचक्रावर आधारित आहे,या पूजा पद्धतीमध्ये लागणाऱ्या वनस्पती व पत्री देखील इतक्या बारकाईने अभ्यासपूर्वक त्या त्या देवतेच्या तत्वा विषयी ठरवून दिलेल्या आहेत कि आश्चर्य वाटते.मग ती विष्णूची तुळस असेल किंवा गणपतीची दुर्वा किंवा एकवीस पत्री.या सर्वांपासुन थोडी निराळी अशी प्राचिन देवता आहे शिव.     ज्याच्या पूजेत अवडंबर असे काहीच नसते अगदी साध्या साध्या गोष्टीउदा.भस्म,जल,चंदन,अक्षता व सर्वात महत्वाचे म्हणजे बेलाचे पान,या त्रिदल पत्रामुळे तो आपल्या भक्तावर प्रसन्न होतो.म्ह्णूनच म्हटले आहे “ त्रिदलं त्रिगुणाकार त्रिनेत्र च त्रिधायुतम I त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्र शिवार्पणम II ” हा आदिनाथ म्हणजे युगा युगांचा योगी ज्याचे वास्तव्य गाव कुसा पासून दूर कुठेतरी अरण्यात किंवा नदीकाठी स्मशानात,त्याचे देवालयही असेच आडबाजूला असते जिथे कुण...
Image
किकली (सातारा) येथील शिवालय सातारा जिल्हा जसा निसर्गरम्य पर्यटन स्थळांनी नटलाय तसाच तो आपल्या खांद्यावर अनेक गिरिदुर्ग देखील मिरवतो आणि अनेक तीर्थक्षेत्रे प्राचीन देवालये सुद्धा ! असेच एक देवालय पाहण्यात आले, आमच्या शिल्प अभ्यास दौऱ्यानिमित्त केलेल्या पाटेश्वर येथील भटकंती नंतर .....       पाटेश्वर वरून येताना चतुर्बेट येथील बारा मोटेची विहीर लागते ती आता सर्वांच्या चांगल्याच परिचयाची झालेली आहे शनिवारी,रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक नियमितपणे त्या देखण्या शिल्प वैभवाला भेट देत असतात. त्याबद्दल इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे म्हणून मुद्दाम इथे सांगत नाहिए बहुतेक पुन्हा कधीतरी नक्की त्याविषयी लिहीन.तर हि बारा मोटेची ऐतिहासिक विहीर पाहून आम्ही आड बाजूने किकली गावाकडे प्रस्थान ठेवले GPS  ऑन केले व निघालो आम्ही, पण इथून कशासाठी आलो असे झाले.. रस्ता उरकतच नव्हता बराच वेळ एका निर्जन अरुंद वाटे वरून चाललो होतो पण त्यात देखील दुतर्फा मस्त हिरवीगार शेती व स्वच्छ पाण्याचे पाट वाहत होते त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता सुरज आणी निखिलची मजा मस्ती चालली...
Image
एक भारलेली अभ्यासयात्रा ( पाटेश्वर, सातारा) “ शिल्प सौंदर्याने नटलेले एक प्राचिन गूढ हिंदूलेणे किंवा मंदिर समूह ” मागे एकदा पाटेश्वरला जाणे झाले पण देवालय परिसर पूर्ण पाहून झालाच नाही, कारण प्राचिन शिल्पं पाहताना वेळ खूप कमी पडतो. खरे सांगायचे तर फोटो सुद्धा काढायला नको वाटते, कधी कधी फोटो काढण्याच्या नादात आपण समोर दिसणारे शिल्प नकळतपणे दुर्लक्षित करीत असतो असे वाटते आणि कालांतराने मग फोटोची आवश्यकता भासू लागते.   आता पाटेश्वर म्हणजे नक्की काय हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल सातारा शहराच्या देगाव जवळील पर्वतरांगेत एकाकी पण “ शिल्प सौंदर्याने नटलेले एक प्राचिन गूढ हिंदूलेणे किंवा मंदिर समूह ” बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.या पर्वत माथ्यावर असणारे मुख्य पाटेश्वर शिवालय सोबत असणाऱ्या इतर मंदिरांच्या तुलनेत अलीकडच्या काळातील म्हणजे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सातारच्या छ.शाहू महाराजांच्या कारकिर्दीतील श्रीमंत परमेश्वर नारायण अनगळ यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिर हेमाडपंथी थाटणीचे असून त्याचे नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पडतात व बऱ्य...